बावनबीर शाळेतील अंकिता झाली अफलातिन मंडळाची प्रतिनिधी
शालेय मुलांमध्ये स्त्री-पुरुष समानता, पर्यावरण संवर्धन, आर्थिक साक्षरता या विषयांवर समज वाढावी म्हणून “अफलातिन” नावाचा कार्यक्रम ५ वी ते १० वी च्या विद्यार्थ्यांसाठी शाळेतील शिक्षकांच्या पुढाकाराखाली तसेच संबंधित शाळा व विकास सहयोग प्रतिष्ठान यांच्या सहकार्याने चालविला जातो.
शिक्षक या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या मुलांना घेऊन ‘अफलातिन मंडळ’ स्थापन करतात व त्यांना सामाजिक विषयांवर माहिती देऊन त्याबाबतचे निर्णय घेण्यास सहकार्य करतात.
शिक्षक या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या मुलांना घेऊन ‘अफलातिन मंडळ’ स्थापन करतात व त्यांना सामाजिक विषयांवर माहिती देऊन त्याबाबतचे निर्णय घेण्यास सहकार्य करतात.
बुलढाणा जिल्ह्यातील बावनबीर गावातील जिल्हा परिषदेच्या इंदिरा गांधी विद्यालयात श्री. कावरे गुरुजींनी शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड बदल घडवून आणला आहे. अंकिता ही गेल्या एक वर्षापासून अफलातिन मंडळासोबत जोडलेली आहे. सुरूवातीला कोणतीही जबाबदारी घ्यायला घाबरणारी अंकिता हिची आज अफलातिन मंडळाची प्रतिनिधी म्हणून निवड झाली आहे.
प्रतिनिधी पद मिळाल्यानंतर सगळे उपक्रम चांगल्या रीतीने अंकिता पार पाडीत आहे. अंकिता आता मुलांसोबत उद्योगांचे चर्चासत्र घेते व बचत बँकेची माहिती मिळाल्यापासून मुले आता बचत करीत आहेत. असे वेगवेगळे उपक्रम अंकिता अगदी जबाबदारीने सांभाळीत आहे हे जेव्हा पालकांना पालक सभेत कळले तेव्हा त्यांनी ह्या बदलामागचे कारण शाळेतील शिक्षकांसमोर विचारल्यावर अंकिता ने सांगितले कि, “अभ्यासाच्या पलीकडे जाऊन अफलातिन मंडळात भाग घेणे, बचत करणे, बैठकीमध्ये आपले मुद्दे मांडणे आणि आता प्रतिनिधी म्हणून कावरे गुरुजींसोबत काम करण्यासाठी निवड होणे हे फक्त अफलातिन मुळे शक्य झाले आहे”. अफलातिन मंडळाची बाकी मुले धमाल-मस्ती करत एकमेकांना विश्वासाने पाठींबा देतात. म्हणूनच यापूर्वी बोलायला घाबरणारी, चार-चौघात न मिसळणारी अंकिता आज अफलातिन मंडळाची प्रतिनिधी झाली आहे.
Comments
Post a Comment