वादा ना तोडो अभियान आणि महाराष्ट्र लोक अधिकार मंच
महाराष्ट्रातील लोकांचा जाहीरनामा
प्रकाशन कार्यक्रम
आपल्या उपस्थितीसाठी आग्रहाचे निमंत्रण
येत्या लोकसभा निवडणुका लक्षात घेऊन गेल्या तीन
महिन्या पासून संपूर्ण देशातील सुमारे २२ राज्यातील २१० लोकसभा मतदार संघातून २५००
पेक्षा जास्त बैठकाद्वारे, प्रत्यक्ष गरीब, वंचित,
उपेक्षित, महिला, अपंग, बालके,
अनुसूचित जाती जमाती, अल्प संख्यांक अश्या समाज घटका सोबत
थेट संवाद साधून त्यांचे प्रश्न, गरजा, आणि
मागण्या अभियानाद्वारे समजून घेतल्या आहेत. महाराष्ट्रात सुद्धा एकूण ९ मतदार
संघातून अश्या बैठका घेऊन व महाराष्ट्र लोक अधिकार मंच तर्फे राज्य पातळीवर विविध
संस्था संघटनांशी सल्ला-मसलत करून महाराष्ट्राचा लोकांचा जाहीरनामा तयार केला आहे.
ह्या जाहीरनाम्याचे प्रकाशन दि. २८ फेब्रुवारी २०१४ रोजी यशवंतराव चव्हाण
प्रतिष्ठान, मंत्रालयासमोर, मुंबई
येथे सकाळी ११ वाजता आयोजित आहे.
समस्त जनता, सर्व
राजकीय पक्षाचे सन्माननीय प्रतिनिधी, विविध सामाजिक संस्थाचे व संघटनाचे
प्रतिनिधी, सर्व माध्यमांचे प्रतिनिधी ह्या कार्यक्रमास
निमंत्रित आहेत. आपणही उपस्थित राहून सहभाग ध्यावा. आपले विचार मांडावेत. आपल्या
पक्षाच्या वतीने प्रतिसाद ध्यावा हि आग्रहाची विनंती.
आपले विनीत
प्रियदर्शी तेलंग
विजय जावंधिया
विश्वनाथ तोडकर, औरंगाबाद
मंगला दैठणकर
नीरजा भटनागर
सुभाष तांबोळी, पुणे
दलित आदिवासी अधिकार
आंदोलन, महाराष्ट्र
शेतकरी नेते, वर्धा
दलित ओबीसी नेते, मराठवाडा
महिला नेतृत्व
मुंबई
किशोरे गोसावी
महाराष्ट्र युवा परिषद
ज्योती नगरकर
महिला विकास परिषद
दिवाकर देशमुख, अकोला
शाश्वत शेती कृती परिषद
अनंत कदम
विकास सहयोग प्रतिष्ठान
दत्ता पाटील, नागपूर
सह-निमंत्रक, वादा ना
तोडो अभियान
Comments
Post a Comment