निसर्ग शेती प्रशिक्षणातून विदर्भातील शेतकऱ्याचे मनोधैर्य वाढवणार !- मोहन सुर्वे
महाराष्ट्र राज्यात होत असलेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या,
विदर्भ मध्ये सातत्याने
जाणवणारा दुष्काळ व शेती मध्ये येणारे
अपुरे पिक यामुळे
शेतकरी निराश व हतबल होत आहे. या परिस्थितीत शेतकऱ्याचे मनोधैर्य वाढण्याकरिता विकास सहयोग प्रतिष्ठान या संस्थेने पुढाकार घेतलेला आहे!
विदर्भातील दुष्काळ, शेतीमधील उदासीनता, जैविक मालाचा होणारा ऱ्हास,
अपुरे पाणी ह्या समस्यांवर पर्याय
शोधण्यासाठी संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मोहन सुर्वे यांनी बुलडाणा जिल्ह्यामध्ये संग्रामपूर
तालुक्यातील बोडखा येथे निसर्ग शेती अभियान महाराष्ट्र अंतर्गत २० एप्रिल,
२०१७ रोजी एकदिवसीय शेती प्रशिक्षण घेतले. शेतकर्यांचे
मनोधैर्य व नेतृत्वाचा विकास करत पारंपारिक व आधुनिक
शेती ज्ञानाचा
नव्याने अवलंब करणे हा या प्रशिक्षणाचा उद्देश होता.
निसर्ग शेती अभियानच्या या प्रशिक्षणात
24 शेतकऱ्यांनी सहभाग घेतला होता तसेच मंडळ कृषी
अधिकारी, स्थानिक सरपंच शासकीय अधिकारी यांनी भेट दिली. हे प्रशिक्षण वर्षभर
चालणार असून एकूण सात सत्रात प्रशिक्षण होणार आहे.
Comments
Post a Comment